नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 आढावा कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण व्हावीत -जिल्हाधिकारी विकास मीना
यवतमाळ, दि. 19 (जिमाका): नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये आणि सर्व कामे निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी येथे दिले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादन,उत्पादकता, उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (टप्पा-2) अंतर्गत सुरू असलेल्या तसेच आगामी काळात सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत योजनेची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील अडचणी आणि पुढील टप्प्यातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे यांच्यासह कृषी विभाग, पाणलोट विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
योजनेत वैयक्तिक गटाची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावे. शेतीचा विकास करण्यासाठी तसेच पिकाचे विविध करण करणे शेतीचा शाश्वत विकास साधने सिंचन सुविधा निर्माण करणे संरक्षित शेती करणे, डाउनलोड विकासाची कामे करून सिंचन सुविधा निर्माण करणे.सोबतच शेतीशी निगडित कृषी व्यवसाय ज्यामध्ये शेतकरी गट महिला गट शेतकरी उत्पादक कंपनी यांनी लाभ घेऊन ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती व शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत शोधणे हा मुख्य उद्देश या प्रकल्पाचा आहे.
यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी योजनेतील सर्व घटकांची प्रभावी, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. पाणलोट क्षेत्र विकास, मृदसंधारणाची कामे, शेततळ्यांची निर्मिती, सूक्ष्म सिंचन व्यवस्था, तसेच शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ग्रामस्तरावर जनजागृती वाढवून शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रभावीपणे राबवून जिल्ह्यात शाश्वत शेती विकास आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
000000





Comments
Post a Comment