बँकेत दावा न केलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी विशेष मोहिम

बँकेत दावा न केलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी विशेष मोहिम यवतमाळ, दि. 24 (जिमाका): रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनात बँकेत दावा न केलेल्या ठेवी संबंधितांना परत मिळण्यासाठी विशेष मोहिम सर्व बँकांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा अग्रणी बँकेतर्फे दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता नियोजनभवनात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ बँक, पेंशन, विमा, शेअर, म्युच्युअल फंड आदी ठिकाणी जमा राहिलेल्या व व्यवहार न झालेल्या रकमा रिझर्व्ह बँकेच्या ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधीमध्ये जमा केल्या जातात. या मोहिमेअंतर्गत अशा बेवारस ठेवी खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यात येणार आहेत. दावा करण्यासाठी नागरिकांनी उद्गम पोर्टल किंवा संबंधित बँक/संस्थेच्या संकेतस्थळावर नाव तपासून आवश्यक कागदपत्रांसह खाते क्रमांक, केवायसी इ. संबंधित बँकेत अर्ज करावा. पात्र नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या हक्काची रक्कम सव्याज परत मिळवावी, असे आवाहन ज्ञानेश्वर टापरे, जिल्हा अग्रणी बॅक प्रबंधक यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती