डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन 31 डिसेंबरपर्यंत मुदत
यवतमाळ, दि. 17 (जिमाका): शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नवीन किंवा नुतनीकरण अर्ज सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह ३१ डिसेंबरपर्यंत संबंधित कार्यालयात हार्डकॉपी सादर करावी. अर्ज सादर न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील, असे आवाहन श्रीमती मंगला मुन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment