सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन
यवतमाळ, दि. 8 - दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अध्यक्षतेखाली सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यामध्ये विशेष गौरव पुरस्कार, माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्ती, विविध कल्याणकारी योजनांचे धनादेश वाटप तसेच युध्दविधवा, वीरमाता यांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजदिन शुभारंभ कार्यक्रम हा वर्षातून एकदाच राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, कुटुंबियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment