Posts

Showing posts from January, 2026

हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी” ’बोले सो निहाल सत श्री अकाल' च्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Image
नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांसाठी लोकसहभागातून चहा, अल्पोपहार, ज्यूस, विविध स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाच...

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

Image
नांदेड, दि. २५ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर वाढून भाविकांची सेवा केली. जिल्हाधिकारी यांनी रांगेत बसलेल्या भाविकांना लंगर सेवा केल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. सेवा, समता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या लंगर परंपरेचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. जिल्हाधिकारी यांनी लंगर सेवेत सहभागी होत शीख परंपरेतील सेवाभाव, मानवता व समतेच्या मूल्यांना अभिवादन केले.ही लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली आहे. शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून भाविक उपस्थित असून, संपूर्ण परिसर भक्तिमय व सेवाभावी वातावरणाने भारावून गेला आहे. या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचा जागर करण्यात येत आहे.
Image
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त निघालेल्या भव्य नगर कीर्तनात अभूतपूर्व उत्साह! 'बोले सो निहाल'चा जयघोष, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी नांदेड, दिनांक २४ (जिमाका) : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त आज नांदेड नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. 'बोले सो निहाल... सत श्री अकाल'चा गगनभेदी जयघोष, आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य 'नगर कीर्तन' सोहळा पार पडला. या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज (दि. २४) सकाळी ८ वाजता तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी येथून प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुद्वारामध्ये विधिवत अरदास करण्यात आली. यानंतर गुरुद्वाराच्या गेट क्रमांक १ जवळ श्री गुरु ग्रंथ साहिबजींची पालखी येताच नांदेड पोलीस दलाच्या वतीने (Guard of Honor) विधिवत 'मानवंदना' देण्यात आली. या सोहळ्याचे सर्वात विलोभनी...

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी हिंद दी चादर गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम

Image
नांदेड, दि. २३ : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून, पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 'शब्द गुरबानी'च्या गायनाने उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले. पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली. या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से. नि.भाप्रसे), हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बॉबी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदींची उपस्थ...

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था लाखो भाविकांसाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब व लंगर साहिब गुरुद्वारांकडून मोफत भोजन सेवा

नांदेड, दि. २३ :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या भोजनासाठी १२ भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून, ही सेवा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा व लंगर साहिब गुरुद्वारा यांच्या वतीने पुरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग स्थळांपासून रेल्वे स्थानक, बसस्थानक व विमानतळ परिसरात विविध ठिकाणी मोफत सेवा स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा तसेच गुरुद्वारा लंगर साहिब येथेही भाविकांसाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या दोन गुरुद्वारांद्वारे भव्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोफत लंगर सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिब...

योग्य नियोजनातून विविध उपक्रम राबवून नांदेड येथील कार्यक्रमात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहावी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

धाराशिव,दि.२२ जानेवारी (जिमाका) “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचे बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असून,त्यांच्या सर्व धर्मांप्रती असलेल्या समानतेच्या भावनेचा आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.त्यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त योग्य नियोजनातून जिल्हाभर विविध उपक्रम राबवावेत तसेच दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमात जिल्ह्यातील संबंधित समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहील,असे नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. दिनांक २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित विभाग प्रमुख, तहसीलदार,गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांची हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत तसेच नांदेड येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि...

गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी समाज बांधवांनी नांदेड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे महंत जितेंद्र महाराज

धाराशिव दि.२२ जानेवारी (जिमाका) सर्व समाजासाठी गुरु तेग बहादूर साहीबजी यांनी त्याग केला.लकीशा बंजारा व गुरु तेग बहादूर साहीबजी यांचा इतिहास अबाधित राहावा हा नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन पोहरादेवी येथील धर्मपिठाचे महंत जितेंद्र महाराज यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बंजारा समाज बांधवांच्या बैठकीत महंत जितेंद्र महाराज बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. महंत जितेंद्र महाराज म्हणाले की, गुरु तेग बहादूर साहीबजी यांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना माहीत झाला पाहिजे.नांदेड येथील कार्यक्रम हा जागतिकस्तरावरचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने लोक नांदेड ...

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना : अंमलबजावणीचा आढावा एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहू नये -डॉ.ओमप्रकाश शेटे

यवतमाळ दि.21 (जिमाका): महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सर्वांसाठी अनेक आजारांवर विनामूल्य उपचार उपलब्ध असून, योजनेची व्यापक अंमलबजावणी करा. एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज येथे दिले. डॉ. शेटे यांच्या अध्यक्षतेत महसूल भवनात आज एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सन 2024 पासून राबविण्यात येत असलेल्या एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश डॉ. शेटे यांनी दिले. यावेळी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण 24 लक्ष 34 हजार 67...

‘स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला!

Image
गाणं, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती सध्याच्या 'फास्ट फूड', 'इन्स्टा रिल्स'च्या युगात एखादा ट्रेंड किती काळ टिकतो ? फार तर २४ तास! पण, याच डिजिटल जगात ४०० वर्षे जुन्या इतिहासाने आजच्या 'जनरेशन झी'ला (Gen Z) चक्क थांबायला भाग पाडले. निमित्त, सुप्रसिद्ध सुफी गायक डॉ. सतींदर सरताज यांच्या आवाजातील 'हिंद की चादर' या कलाकृतीचे. नांदेडच्या पवित्र मातीत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा ३५० व्या भव्य शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समितीच्या सहकार्याने र्निवैर निर्मित 'हिंद की चादर' डॉक्युमेंटरी (माहितीपट), अन् सरताज यांचे गीत आता केवळ व्हायरल कंटेंट उरला नसून, ती एक 'संस्कारांची डिजिटल चळवळ' बनली आहे. सुरांचा जादूगर : कोण आहेत सतींदर सरताज ? या चळवळीचा चेहरा आणि आवाज आहेत, डॉ. सतींदर सरताज. मूळचे पंजाबचे. सरताज केवळ गायक नाहीत, तर सुफी संगीतातील 'डॉक्टरेट' (Ph.D) आहेत. त्यांच्या गळ्यातून जेव्हा “सीस लेकर उसी ओर चल दिए...” हे...

हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या त्याग व बलिदानाला विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतातून दिला उजाळा सामूहिक गीताच्या माध्यमातून गुरुंच्या त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश पोहोचविण्याचे कार्य – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Image
नांदेड, दि. 21 जानेवारी : हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गीताच्या माध्यमातून श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या धर्मरक्षण, त्याग व बलिदानाला भावपूर्ण उजाळा दिला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी हात जोडून “नवमे गुरु पैदा हुए गुरु के महल में” हे गीत सादर केले. त्यानंतर “जो बोले सो निहाल, सत श्री अकाल”, “हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर”, “भारत माता की जय” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात आला आहे. या माध्यमातून गुरुंचा ऐतिहासिक त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल...
Image

नेहरू महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रमाचे आयोजन कोलामी गाव बांधणी,आंध समाजातील दंडार सादर होणार

यवतमाळ, दि. २० (जिमाका) : मराठी भाषेच्या विविध बोलींचे जतन संवर्धन करण्याच्या उद्देशाने भाषा संचालयनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्रात ३६ जिल्हे ३६ कार्यक्रम होणार आहेत.त्यापैकी यवतमाळ जिल्हयातून नेर येथील नेहरू महाविद्यालयात दिनांक २३जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग,भाषा संचालनालय मुंबई,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व नेहरू महाविद्यालय मराठी विभाग नेर यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी भाषा पंधरवडा २०२६ "अंतर्गत कोलामी व आंध या बोलींचा जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.परमानंदजी अग्रवाल हे आहेत तर उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अविनाश असनारे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच विद्यापीठाचे पदव्युत्तर मराठीचे प्रा.डॉ.माधव पुटवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.कोलामी बोलीचे अभ्यासक प्रा.घनःश्याम दरणे तसेच आंध बोलीचे आभ्यासक डॉ.गजानन लोहवे हे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.सहाय्यक,भाषा संचालक मुंबई, येथील मा.संतोष गोसावी,मा.श्री.जनार्दन पाटील, अनुवादक,महाराष्...

क्रीडा संकुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा – जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, दि. २० (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे यशस्वीपणे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विकास मीना होते. बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी, क्रीडा विभागाचे प्रतिनिधी तसेच समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शासन निर्णय दिनांक 24 सप्टेंबर 2025 अन्वये जिल्हा क्रीडा संकुल समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून, त्यानुसार जिल्हा क्रीडा संकुल समितीत झालेल्या बदलांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा पूर्वाश्रमीचे उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांचे स्वागत समितीच्या सदस्य सचिव शिल्पा चाबूकस्वार यांनी रोपटे देऊन केले. शासन निर्णयानुसार स्थायी सदस्य व आमंत्रित सदस्यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी महेश पडोळे, तालुका क्रीडा अधिकारी श्रद्धा सावंत व आरती काळे, क्रीडा अधिकारी चैताली लोखंडे व सचिन हरणे, कार्यालयीन लिपिक कल्याणी रत्नपारखी आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्हा क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त...

जिल्हाधिका-यांकडून आढावा औद्योगिक प्रकल्पांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा – जिल्हाधिकारी विकास मीना

Image
यवतमाळ, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात औद्योगिक विकासाला गती मिळणे आवश्यक असून, औद्योगिक प्रकल्पांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज दिले. जिल्हाधिका-यांनी एमआयडीसी व महावितरण आदी यंत्रणांकडे उद्योगांशी संबंधित विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा आज महसूलभवनात घेतला. यावेळी त्यांनी औद्योगिक वसाहतीतील रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांची माहिती घेतली व प्रलंबित कामांची सद्य:स्थिती जाणून घेत वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविण्यास प्राधान्य द्यावे. उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योगांवर होणारा परिणाम लक्षात घेता भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी औद्योगिक क्षेत्रातील पोलीस चौकीसंदर्भातही चर्चा करण्यात आल...

सत्य, सहिष्णुता आणि त्यागाचा दीपस्तंभ : गुरु तेग बहादुर साहिब

सत्य, सहिष्णुता आणि त्यागाचा दीपस्तंभ : गुरु तेग बहादुर साहिब शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब जी (एप्रिल 1621 – नोव्हेंबर 1675) यांनी अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात निर्भयपणे लढा देत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सत्य, धर्म, सहिष्णुता आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानामुळे त्यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून गौरविण्यात आले. अमृतसर येथे गुरु हरगोबिंद साहिब व माता नानकी देवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मूळ नाव त्यागमल असलेल्या गुरुजींना बालपणीच्या शौर्यामुळे ‘तेग बहादुर’ हे नाव प्राप्त झाले. ते अत्यंत शांत, ध्यानशील व संयमी होते. सांसारिक वैभवाचा त्याग करून त्यांनी आनंदपूर साहिब येथे साधना व सेवेमध्ये जीवन व्यतीत केले. 1664 मध्ये त्यांना गुरु पदवी प्राप्त झाली. धार्मिक अत्याचार व जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी बलिदान पत्करले. दिल्लीतील चांदणी चौक येथे कैदेत असतानाही त्यांनी संयम व ध्यानाचा मार्ग सोडला नाही. 1675 साली त्यांनी मानवाधिकार व धर्मस्वातंत्र्यासाठी शहिद...

गुरु तेग बहादूर आणि संत नामदेव: मूलभूत विचारांची समानता

Image
गुरु तेग बहादूर आणि संत नामदेव: मूलभूत विचारांची समानता “हिंद दी चादर” नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा ही विविध संत, गुरू आणि विचारवंतांच्या योगदानातून समृद्ध झालेली आहे. या परंपरेत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे अग्रणी संत नामदेव महाराज (इ.स. १२७०–१३५०) आणि शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिब (इ.स. १६२१–१६७५) हे दोन युगपुरुष वेगवेगळ्या काळात जन्मले. या दोघांमध्ये सुमारे तीन शतकांचे कालांतर असले, तरी त्यांच्या जीवनकार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यास मूलभूत विचारधारेत लक्षणीय समानता आढळून येते. ही समानता अधोरेखित करण्याच्या दृष्टीने नांदेड येथे आयोजित करण्यात येणारा “हिंद दी चादर” हा विशेष उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतो. संत परंपरेचा समान मूल्याधिष्ठान संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून भक्ती, सत्य, साधेपणा आणि मानवी समता यांचा पुरस्कार केला. त्यांनी जात, वर्ण आणि कर्मकांडांवर आधारित भेदभावाला ठाम विरोध केला. “ईश्वर सर्वत्र आहे” ही भावन...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात एक कोटीपर्यंतच्या प्रकल्पांना अनुदान

यवतमाळ दि. १9 जिमाका: स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे प्रकल्प खर्चाची कमाल मर्यादा वाढविण्यात आली असून उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आता एक कोटी रुपये तर सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच सेवा उद्योगांसाठी प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के आणि उत्पादन उद्योगांसाठी ४० टक्क्यांपर्यंत खेळत्या भांडवलाची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध प्रवर्गांसाठी अनुदानाच्या दरातही सुधारणा करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, अल्पसंख्यांक व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना उत्पादन प्रकल्पांसाठी ग्रामीण भागात ३५ टक्के म्हणजेच कमाल १७ लक्ष ५० हजार रुपये व शहरी भागात २५ टक्के म्हणजे १२ लक्ष ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सेवा उद्योगांसाठी ग्रामीण भागात ७ लक्ष व शहरी भागात ५ लक्ष रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. योजनेत नव्याने कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल,ढ...

फेब्रुवारीत विधी सेवा महाशिबिराचे आयोजन

यवतमाळ दि. १७ जिमाका: विधी सेवा महाशिबिर फेब्रुवारीत महिन्यात आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले असून, हे शिबिर नेर, तालुक्यांमध्ये घेण्यात येणार असुन यामध्ये दारव्हा व बाभुळगाव या दोन तालुक्याचा समावेश आहे. या शिबिराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय व कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शेखर चु. मुनघाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय सेवा सदन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा न्यायाधीश-1,एस.यु.बघेले, यांनी भूषविले तसेच बैठकीस सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर न्यायीक अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत विधी सेवा महाशिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक पूर्वतयारी, कार्यपद्धती तसेच विविध विभागांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये जिल्हा शल्य चिकीत्सक,...

विशेष लेख श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

Image
नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव यांच्या भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम याविषयी या लेखातून ऊहापोह करण्यात आला आहे. भारतीय आध्यात्मिक आणि संत परंपरा ही विविध काळात, विविध प्रदेशात जन्मलेल्या थोर विभूतींनी समृद्ध झालेली आहे. या परंपरेत शीख धर्माचे नववे गुरू, हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि महाराष्ट्रातील म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दोघांचे कार्य, विचार आणि त्याग हे धर्मरक्षण, मानवता, समता आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक मानले जातात. संत नामदेव महाराज हे १३ व्या-१४ व्या शतकातील महान भक्त संत असून त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समाजात समता, नामस्मरण आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. जात-पात, उच्च-नीच भेद नाकारून त्यांनी सामान्य जनतेला ईश्वरभक्तीचा मार्ग मोकळा ...

विशेष लेख हिंद दी चादर - गुरु तेग बहादूर साहिबजी

Image
भारतीय इतिहासात सत्य, करुणा आणि मानवतेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या महान संत व योद्ध्यांचा समावेश आहे. अशा युगपुरुषांमध्ये शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी केवळ आपल्या श्रद्धेसाठी नव्हे, तर सर्व धर्मांच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले म्हणूनच ते “हिंद दी चादर” — भारताची संरक्षक ढाल म्हणून ओळखले जातात. समाजाचे स्वातंत्र्य धोक्यात आले असताना गुरु तेग बहादूर साहिबजी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध उभे राहिले. त्यांनी शस्त्रापेक्षा सत्य, संयम आणि नीतिमत्ता या मूल्यांना अधिक बळ दिले. त्यांच्या उपदेशात सेवा, साधेपणा, परोपकार आणि निर्भयता यांचा सातत्याने पुरस्कार दिसतो. त्यांच्या अनेक रचना आजही गुरु ग्रंथ साहिबमध्ये आदराने समाविष्ट आहेत. जेव्हा संपूर्ण भारतात अन्याय वाढला होता, तेव्हा गुरु तेग बहादूर साहिबजींनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी प्रतिकार केला, पण द्वेषाने नव्हे तर आत्मबलाने. त्यामुळे त्यांना हिंद दी चादर ही उपाधी मिळाली — म्हणजेच संपूर्ण भारताला झाकणारी करुणेची ढाल. ही उपाधी केवळ शिख समाजाची नव्हे, तर समस्त भारतीयांची कृतज्ञतेची...

औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मिना यांच्याकडून एमआयडीसी व वीज केंद्राची पाहणी

Image
यवतमाळ, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी विकास मिना यांनी आज एमआयडीसी तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईबी) पॉवर हाऊसला भेट देऊन साईट पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर पाहणी केली. एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा आणि वीजविषयक अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच उद्योगवाढीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष पाहणी करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रात वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मिना यांनी दिल्या. या पाहणीमुळे एमआयडीसीतील उद्योगांना दिलासा मिळणार असून जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व...

भारतीय इतिहासात सत्य, करुणा आणि मानवतेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या महान संत व योद्ध्यांचा समावेश आहे. अशा युगपुरुषांमध्ये शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे स्थान अद्वितीय आहे.

Image

गुरु तेग बहादूर यांचे बलिदान हे केवळ शीख धर्मासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या इतिहासातील एक सर्वोच्च आदर्श.

Image

आदिवासी क्षेत्रात सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी ‘कन्यादान योजना’ राबविणार प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : सन 2025-26 मध्ये आदिवासी क्षेत्रातील आदिवासी समाजबांधवांच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक व जादा खर्च कमी करण्यासाठी तसेच विवाहाशी संबंधित अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा यांच्या मार्फत ‘कन्यादान योजना’ राबविण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी दिली. या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या नवदाम्पत्यांना 25 हजार इतके आर्थिक सहाय्य वर-वधूच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभार्थी हस्तांतरण (डी बी टी) पद्धतीने अदा करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्रात सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सेवाभावी संस्था/यंत्रणांना प्रत्येक जोडप्यामागे 2 हजार 500 इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांनी विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर टीएसपी क्षेत्रातील आदिवासी उ...

‘हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड ! • विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम • चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

लातूर, ‍दिनांक 15 (विमाका) : धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे ३५० वे शहीदी समागम वर्ष ! या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून, श्री. गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास, त्यांच्या त्यागाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ‘प्रभात फेरी’च्या माध्यमातून शिक्षण विभाग करत आहे. प्रभात फेरी गुरूवार पासून (दि.१६ ते २३ जानेवारी) जिल्हाभरातील शाळांमधून निघणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. नांदेड येथील आसर्जन परिसरातील (मोदी ग्राउंड) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘घराघरात आणि मनामनात’ हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे विचार रुजविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.विद्यार्थी होणार ‘विचारदूत’ केवळ पुस्तकी...

*सेवेतून भक्तीचा मार्ग * ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या*

*विशेष लेख*. १४ जानेवारी २०२६ भारतीय इतिहासात धर्म, मानवता, त्याग आणि बलिदान यांचे अद्वितीय प्रतीक म्हणून श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे नाव अजरामर आहे. धर्मस्वातंत्र्य, मानवमूल्ये आणि सत्यासाठी प्राणार्पण करणारे ते “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या महान शहिदीच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात २४ व २५ जानेवारी रोजी एक भव्य, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य समागम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ५३ एकर विस्तीर्ण मैदानावर संपन्न होणार असून, देश-विदेशातून जवळपास १० लाखांहून अधिक भाविक या पवित्र समागम कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, सेवा, समानता आणि मानवतेचा महासंगम ठरणार आहे. *नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग* या ऐतिहासिक शहीदी समागमाचे आयोजन नऊ समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग, “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच सीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन स...

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त श्रमदान · दोन हजारविद्यार्थ्यांचा ऐतिहासिक श्रमदानात सहभाग · नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन · २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

Image
नांदेड, दि. १३ : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदान येथे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या कालावधीत मैदानावर गुरुद्वारा प्रतिकृती (दरबार साहिब) असणार असल्याने भाविकांना चप्पल अथवा बूट न वापरता अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना चालताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत विशेष श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या श्रमदानात नांदेड जिल्ह्यातील १,५०० विद्यार्थी, ॲकॅडमीचे ५०० विद्यार्थी महापालिकेचे कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. श्रमदानाद्वारे मैदानावरील खडे वेचून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, क्षेत्रीय धर्मजागरण समितीचे प्रमुख महेंद्रजी रायचुरा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, तहसीलदार आनंद देऊळगावकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, रेडक्रॉसचे हर्षद शहा, मनपा अतिर...

श्री गुरू तेग बहादूर यांचे 350 वे शहिदी समागम वर्ष नांदेडमध्ये होणार भव्य सोहळा

Image
यवतमाळ, दि. 13 (जिमाका) : 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे. श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर व नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन झाले. आता जानेवारीमध्ये त २४ व २५ जानेवारीला नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचा मुंबई येथील कार्यशाळेने शुभारंभ करण्यात आला होता. श्री गुरू तेग ...
विशेष लेख मानवतेसाठी बलिदान देणारे महान गुरू : श्री गुरु तेग बहादुर – ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल १६२१ – नोव्हेंबर १६७५) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या नावाने गौरविले जाते. धर्म, मानवता, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरूतेग बहादुर साहिब जी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आय...
विशेष #लेख धर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी ! शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर साहिब जी हे धर्म, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान गुरु होते. शीख इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासात त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून सन्मानाने ओळखले जाते. श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे वैशाख कृष्ण पंचमी या पवित्र तिथीला झाला. बालपणी त्यांना त्यागमल या नावाने ओळखले जात होते. लहानपणापासूनच ते निर्भय, शूर, विचारशील व उदार स्वभावाचे होते. त्यांचे शिक्षण मीरी-पीरीचे स्वामी, गुरु-पिता श्री गुरु हरगोबिंद साहिबजी यांच्या छत्रछायेत झाले. अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी वडिलांसोबत परकीय आक्रमणाविरुद्ध लढा देत पराक्रम गाजवला. त्यांच्या शौर्याने प्रभावीत होऊन गुरु हरगोबिंद साहिबजी यांनी त्यांना ‘तेगबहादुर’ हे नाव दिले, ज्याचा अर्थ ‘तलवारीचा धनी’ असा होतो. या काळात त्यांनी गुरुबाणी, धर्मग्रंथांचे अध्ययन तसेच अस्त्र-शस्त्रविद्या व घोडेस्वारीचे शिक्षण आत्मसात केले. शीख (सिख) धर्माचे आठवे गुरु श्र...

पाणलोट क्षेत्र विकासासाठी महा प्रकल्प राज्यातील 26 तालुक्यांत प्रकल्प

यवतमाळ, दि. १२ : ॲक्सिस बँक फौडेंशन, भारत रूरल लाइव्हलीहूड फौंडेशनतर्फे मनरेगाशी सांगड घालून राज्यातील यवतमाळ,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड या पाच जिल्ह्यातील 26 तालुक्यांमध्ये ‘हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे. त्याद्वारे 878 लघु पाणलोटक्षेत्रे विकसित करण्यात येणार आहेत. त्याचा लाभ 4.39 लक्ष हे. क्षेत्राला होणार आहे. ग्रामपंचायतींना कामांचे नियोजन, संनियंत्रण व अंमलबजावणी यासाठी सहयोग करण्यासाठी सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेनची निवड करण्यात आली आहे. एक सोसायटी दोन तालुक्यात काम करणार आहे. कमीत कमी एक लक्ष शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणे, 1.77 लक्ष हे. शेतीक्षेत्राला सिंचन पुरविणे, बहुविध पीक प्रणालीला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, मनरेगाच्या निधीतून टिकाऊ व उत्पादक संसाधनांची निर्मिती करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत. जीआयएस प्रणालीच्या मदतीने पाणलोट क्षेत्र निश्चित करण्यात आले असून तालुकानिहाय ग्रामपंचायत, गाव, जीआयएस आधारित सविस्तर प्रकल्प आराखडा, पाणलोटांचे एकूण भौगोलीक क्षेत्र आदी बा...

२४ जानेवारीपूर्वी ई-पीक पाहणी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रब्बी हंगाम साठी (ई-पीक पाहणी डी सी एस) उपक्रमाची सुरुवात १० डिसेंबर २०२५ पासून करण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा स्वतः अँड्रॉइड मोबाईलद्वारे नोंदणी कराची आहे. शेतकरी स्तरावर पीक पाहणीसाठी २४ जानेवारी ही अंतिम मुदत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५७०.३८ हेक्टर आर क्षेत्रावर पीक पेरा असून, एकूण ५लक्ष ६७हजार ५३६ मालक प्लॉटपैकी केवळ ३४ हजार ८०१ प्लॉटवर शेतकऱ्यांनी डी एस सी व्हर्जन 4.0.5 या मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणीची नोंद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत फक्त ६.१३ टक्के प्लॉटवरच ई-पीक पाहणीची नोंदणी झालेली आहे. उर्वरित सर्व शेतकरी बांधवांनी तातडीने ई-पीक पाहणी अॅपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ई-पीक पाहणीसाठी अँड्रॉइड मोबाईल आवश्यक असून, संबंधित अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यापूर्वी गुगल क्रोम अपडेट करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी थेट शेत बांधावर जाऊन पीक नोंदणी करून माहिती अपलोड करावी, असे...