यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉनमुळे रविवारी वाहतुकीत बदल ४ जानेवारी रोजी सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत काही मार्ग बंद; पर्यायी मार्गांची व्यवस्था

यवतमाळ, दि.2 (जिमाका) : यवतमाळ शहरात रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेमुळे शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ३ हजार स्पर्धक सहभागी होणार असून स्पर्धा सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत चालणार आहे. ही मॅरेथॉन नेहरू स्टेडियम, गोधनी रोड येथून सुरू होऊन तहसील चौक, शहर पोलीस स्टेशन, महात्मा फुले पुतळा, एलआयसी चौक, जिल्हाधिकारी निवासस्थान, जिल्हा न्यायालय, पोस्ट ऑफिस चौक, स्टेट बँक चौक, कॉटन मार्केट चौक, पॉलिटेक्निक कॉलेज गेट क्रमांक-२, मोहा फाटा, धामणगाव मार्गे करळगाव घाट, वाघाई मंदिराजवळ यु-टर्न घेऊन पुन्हा नेहरू स्टेडियम येथे समाप्त होणार आहे. हा मार्ग अंदाजे ११ किलोमीटर लांबीचा आहे. स्पर्धेदरम्यान वाहतुकीची कोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकारी विकास मीना यांनी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ अंतर्गत अधिकार वापरून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यवतमाळ शहर वाहतुकीस बंद मार्ग व पर्यायी मार्गांची माहिती पांढरकवडा,यवतमाळ शहर, पर्यायी मार्ग येणारी-जाणारी जडवाहतूक ही आर्णी बायपास रोडने वळविण्यात येणार आहे.पांढरकवडा रोड,शारदा चौक,संविधान चौक, या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग भोसा रोडने वळविण्यात येईल.दारव्हा,नेर, व यवतमाळ पर्यायी मार्ग येणारी वाहतूक संविधान चौक ते आर्णी रोड ते नागपूर बायपास रोडने सुरू राहील. बाभुळगाव, यवतमाळ पर्यायी मार्ग बाबुळगांव रोडणे यवतमाळ शहरात येणारी वाहतूक करळगांव घाटाच्या खाली थांबविण्यात येणार असून सकाळी ५.४५ ते ११ वाजेपर्यंत रस्ता बंद राहील.पिंपळगाव,धामणगाव,यवतमाळ मार्ग सकाळी ५.४५ ते १०.३० वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम १३१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.नागरिकांनी व वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस