लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत जिल्हा स्तरीय आढावा बैठक नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा द्यावी - डॉ. नारुकुल्ला रामबाबु
यवतमाळ, दि.2 (जिमाका) : प्रत्येक नागरिकाला वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देणे ही आपली जबाबदारी आहे. सर्व विभागांनी काल मर्यादा पाळून आपली कामे पूर्ण करावी असे निर्देश लोकसेवा हक्क आयुक्त डॉ नारुकुल्ला रामबाबू यांनी दिले
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत “आपली सेवा आमचे कर्तव्य”या संकल्पनेनुसार राज्य सेवा हक्क आयुक्त अमरावती डॉ. नारुकुल्ला रामबाबु यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस जिल्हाधिकारी विकास मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध विभागांकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या लोकसेवांची कामगिरी, सेवा देण्यातील कालमर्यादा, अर्ज निकाली काढण्याचे प्रमाण, प्रलंबित प्रकरणे तसेच तक्रार निवारण याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. महसूल, पंचायत राज, वन विभाग, आरोग्य, शिक्षण, नगर प्रशासन आदी विभागांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले.
राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. नारुकुल्ला रामबाबु यांनी नागरिकांना वेळेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच विलंब व दुर्लक्ष टाळावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
000000



Comments
Post a Comment