फेब्रुवारीत विधी सेवा महाशिबिराचे आयोजन

यवतमाळ दि. १७ जिमाका: विधी सेवा महाशिबिर फेब्रुवारीत महिन्यात आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले असून, हे शिबिर नेर, तालुक्यांमध्ये घेण्यात येणार असुन यामध्ये दारव्हा व बाभुळगाव या दोन तालुक्याचा समावेश आहे. या शिबिराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय व कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शेखर चु. मुनघाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय सेवा सदन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा न्यायाधीश-1,एस.यु.बघेले, यांनी भूषविले तसेच बैठकीस सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर न्यायीक अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत विधी सेवा महाशिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक पूर्वतयारी, कार्यपद्धती तसेच विविध विभागांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये जिल्हा शल्य चिकीत्सक, वनविभाग सामाजिक वनिकरण, कृषी विभाग, समाजकल्याण, कामगार विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा कौशल्य विकास विभाग, परिवहन विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, महिला व बालविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, नगर परिशद विभाग, समाजकल्याण विभाग, वाहतुक विभाग, पंचायत समिती, तहसिल विभाग, सखी वन स्टॉप सेंटर , महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा अग्रणी बॅंक, महाराष्ट्र उर्जा विभाग, आदी विभागांनी आपल्या-आपल्या योजनांचे स्टॉल उभारून नागरिकांना माहिती व लाभ देण्याचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. यापूर्वी मार्च 2025 मध्ये जवळा येथे आयोजित महा विधी सेवा शिबिराचा अनुभव लक्षात घेता, यंदा अधिक नियोजनबद्ध व प्रभावी स्वरूपात शिबिर आयोजित करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक विभागाने आपल्या योजनांतील लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून शिबिराच्या दिवशी पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देता येईल, असे यावेळी सांगितले . हे शिबिर फेब्रुवारी महिन्यामध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नरेगा अंतर्गत विहीर व शोषखड्डे, घरकुल योजना, स्वच्छता गृह, कृषी व सामाजिक कल्याण योजनांसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. तसेच शिबिरस्थळी स्वच्छता, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था व लाभार्थी तसेच उपस्थित पाहुण्यांच्या गरजा योग्यरीत्या पूर्ण होतील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. या अनुषंगाने पुढील बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस