5 जानेवारी रोजी लोकशाही दिन
यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : महिन्यातील पहिल्या सोमवारी दि. 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे स्वीकारण्यात येणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसावी.
महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
000000
--
Comments
Post a Comment