नेहरू महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रमाचे आयोजन कोलामी गाव बांधणी,आंध समाजातील दंडार सादर होणार
यवतमाळ, दि. २० (जिमाका) : मराठी भाषेच्या विविध बोलींचे जतन संवर्धन करण्याच्या उद्देशाने भाषा संचालयनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्रात ३६ जिल्हे ३६ कार्यक्रम होणार आहेत.त्यापैकी यवतमाळ जिल्हयातून नेर येथील नेहरू महाविद्यालयात दिनांक २३जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग,भाषा संचालनालय मुंबई,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व नेहरू महाविद्यालय मराठी विभाग नेर यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी भाषा पंधरवडा २०२६ "अंतर्गत कोलामी व आंध या बोलींचा जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.परमानंदजी अग्रवाल हे आहेत तर उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अविनाश असनारे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच विद्यापीठाचे पदव्युत्तर मराठीचे प्रा.डॉ.माधव पुटवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.कोलामी बोलीचे अभ्यासक प्रा.घनःश्याम दरणे तसेच
आंध बोलीचे आभ्यासक डॉ.गजानन लोहवे हे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.सहाय्यक,भाषा संचालक मुंबई, येथील मा.संतोष गोसावी,मा.श्री.जनार्दन पाटील, अनुवादक,महाराष्ट्र शासन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.सकाळी ग्रंथदिंडीने या बोलीजागरला प्रारंभ होणार असून त्यानंतर ९.३० वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. याचवेळी
क्रांतिवीर श्यामादादा कोलाम लोककला मंडळ गणेशवाडी ता. कळंब यांचा ' कोलाम गावबांधणी ' तर विश्वनाथ आंध आदिवासी दंडार मंडळ कोरटा ( वन) ता. उमरखेड ह्या लोककला हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे.
तरी या कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी विभाग तसेच प्राचार्य डॉ.उदय मांजरे,आणि बोलींचा जागर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.शांतरक्षित गावंडे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment