औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मिना यांच्याकडून एमआयडीसी व वीज केंद्राची पाहणी
यवतमाळ, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी विकास मिना यांनी आज एमआयडीसी तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईबी) पॉवर हाऊसला भेट देऊन साईट पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर पाहणी केली.
एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा आणि वीजविषयक अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच उद्योगवाढीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष पाहणी करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रात वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मिना यांनी दिल्या.
या पाहणीमुळे एमआयडीसीतील उद्योगांना दिलासा मिळणार असून जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी महाव्यवस्थापक सुनील गरुड, एमआयडीसीचे उपअभियंता नरेंद्र विचुरकर, कनिष्ठ अभियंता चैताली गुडदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
000000



Comments
Post a Comment