कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतक-यांना प्रशिक्षण
यवतमाळ, दि.31 (जिमाका) : भारतीय कृषि अनुसंधान परिषदेअंतर्गत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था, व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑक्टोबर रोजी माळवणी, कळंब येथे अति सघन कापूस लागवड प्रकल्पा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रमुख कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक कछवे होते. विशेषज्ञ किटकशास्त्र कृषि विज्ञान केद्र डॉ.प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ अभियांत्रिकी राहुल चव्हाण, सरपंच दिपाली जामुलकर, सुदर्शन पतंगे,शिवानी बावनकर, रविंद्र राठोड, गौरव येलकर, नयन ठाकरे, अमोल वाळके  उपस्थित होते.  विदर्भातील पिक कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव,पांढरकवडा, वणी, मारेगाव, घाटंजी, आर्णी तालुक्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाच्यादृष्टीने शेतकरी प्रशिक्षण प्रकल्प राबविला जात आहे.  कार्...