
वीर मातेलाही महसूल विभागाची मदत * बळीराजाचा चेतना अभियानाचा पुढाकार यवतमाळ , दि.2 8 ः श्रीनगरमधील उरी येथे 18 सष्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या विकास कुडमेथे यांच्या वीर पत्नी यांना 51 हजार 400 रूपयांची मदत देण्यात आली होती. त्याचप्रमाणे वीरमाता विमल जर्नादन कुडमेथे यांना 55 हजार 800 रूपयांची मदत वितरीत करण्यात येणार आहे. हि मदत कुटुंबीयांसाठी वैयक्तीक स्तरावर महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी 1 लाख 7 हजार 200 रूपयांची मदत गोळा करण्यात आली होती. हि मदत बळीराजा चेतना अभियान समितीच्या पुढाकारोने वितरीत करण्यात आली. यासाठी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी 5 हजार रूपयांची मदत केली असून महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील आणि उपविभागीय अधिका-यांनी प्रत्येकी दोन हजार रूपये मदतनिधी दिला. तर तहसीलदार नायबतहसीदार संघटनेकडून 15 हजार रूपये , पुसद तहसील कार्यालयाने 15 हजार , जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व तहसील पुरवठा निरीक्षक कार्यालयाकडून 15 हजार रूपये , तहसीलदार सचिन शेजाळ यांनी ...