
आपत्ती व्यवस्थापनातर्फे जनजागृती प्रशिक्षण यवतमाळ, दि. 31 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत एनडीआरएफ तळेगाव, पुणेतर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. एनडीआरएफची 25 व्यक्तींने प्रशिक्षण आणि रंगीत तालीम दि. 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणादरम्यान दि. 29 ऑगस्ट रोजी लोहारा एमआयडीसी येथील राणा इंडस्ट्रीज येथे औद्योगिक अपघात, आपत्तीबाबत रंगीत तालीम केली. रंगीत तालीममध्ये कारखान्यामधील आग लागण्याची कारणे, उपलब्ध रसायनांमुळे होणारा अपघात, त्याला द्यावयाचा प्रतिसाद, अपघात होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत एनडीआरएफने रंगीत तालीममधून दाखविले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख उपस्थित होते. रंगीत तालीममध्ये फायर ब्रिगेड, नगर परिषद, 108 ॲम्बुलंस, शल्य चिकित्सक, वाहतूक पोलिस विभागातील चमू, ...